नगरविकास विभागाकडून नवीन चार सहायक आयुक्तांची नेमणूक*

 *पनवेल महापालिकेच्या प्रभाग मध्ये  सहायक आयुक्त कार्यरथ *


*नगरविकास विभागाकडून नवीन चार सहायक आयुक्तांची नेमणूक*

*पनवेल :* पनवेल महानगरपालिकेच्या पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या चारही प्रभाग कार्यालयामध्ये शासनाच्या नगरविकास विभागाकडून  चार सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रभाग कार्यालयास अधिक बळकटी येणार असून, प्रभाग कार्यालयांचा कारभार अधिक गतिमान होणार आहे.


आकृती बंधामध्ये प्रभाग अधिकारीपदी सहाय्यक आयुक्ताची नेमणूक करण्याची तरतूद असून यानूसार आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी दिलेल्या सूचनेनूसार पनवेल प्रभाग ‘ड’ कार्यालयामध्ये डॉ. रूपाली माने यांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कामोठे प्रभाग ‘क’ कार्यालयामध्ये सुबोध ठाणेकरयांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कळंबोली प्रभाग ‘ब’ कार्यालयामध्ये श्रीराम पवार यांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खारघर प्रभाग ‘अ’च्या सहायक आयुक्तपदी स्मिता काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


याबरोबरच रोशन माळी (मो.नं 8108893585)यांची प्रभाग ‘ड’ च्या प्रभारी अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदाशिव कवठे(9819633174) यांची प्रभाग ‘क’ च्या अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी अरविंद पाटील (9322351897)यांची प्रभाग ‘ब’ च्या प्रभारी अधिक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र मढवी (9819998788) यांची प्रभाग ‘अ’प्रभारी अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


 महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागामध्ये  शासनाकडील सहायक आयुक्त रूजू झाल्याने प्रभाग कार्यालयांच्या कामकाजास बळकटी मिळणार आहे. प्रभाग कार्यालयांचा कारभार सक्षम होणार असून नागरिकांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नजिकच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.


चौकट

1.प्रभाग ड पनवेल,

प्रभाग अधिकारी 

सहायक आयुक्त डॉ.रूपाली माने       मो.नं 8108238303


2.प्रभाग क कामोठे,

प्रभाग अधिकारी 

सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर        मो.नं 8450992129


3.प्रभाग ब कळंबोली,

प्रभाग अधिकारी 

सहायक आयुक्त श्रीराम पवार          मो. नं 7820885971


4. .प्रभाग अ खारघार

प्रभाग अधिकारी 

सहायक आयुक्त स्मिता काळे            मो.नं 9665283599