बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पनवेलमध्ये महाविकास आघाडीचे मूक आंदोलन*

 *बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पनवेलमध्ये महाविकास आघाडीचे मूक आंदोलन*


*पनवेल: बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेनंतर पालकांचा उद्रेक झाला होता. तेथील नागरिकांनी 10 तास बदलापूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केले. यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवले. मात्र बदलापूरसह राज्यात होणार्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी तोंडाला तसेच हाताला काळ्या पट्ट्या लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध केला.

पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला म्हात्रे, शेकापचे गणेश कडू, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, मा.नगरसेविका सुरेखा मोहोकर, मा.नगरसेवक गोपाळ भगत, रविंद्र भगत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपमहानगरप्रमुख रामदास पाटील, तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर,  शिवसेना महिला आघाडी शहरसंघटक अर्चना कुळकर्णी, शहरप्रमुख प्रवीण जाधव, अरुण ठाकूर, निखील भगत, पराग मोहिते, डॉ.अमित दवे, काशिनाथ पाटील, शशिकांत बांदोडकर, हेमराज म्हात्रे, नंदराज मुंगाजी, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे  जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, मा.नगरसेवक शंकर म्हात्रे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एक चिमुकली भाजप सरकारचा निषेध करणारे फलक घेवून या आंदोलनात सहभागी झालेली पाहायला मिळाली.