जेएनपीटी बंदराबाहेर ८५०० कंटेनर परदेशात जाण्यापासून रखडले

 जेएनपीटी बंदराबाहेर ८५०० कंटेनर परदेशात जाण्यापासून रखडले

पनवेल /उरण:-  गेल्या २८ तासांपासून मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन असल्याकारणाने जेएनपीटी बंदरातून परदेशात जाणारे सुमारे ८५००  हून अधिक कंटेनर जेएनपीटी बंदराच्या बाहेर उभे आहेत. कुठल्या जहाजातून कुठला कंटेनर पाठवायचा ही प्रक्रिया पुर्णपणे ठप्प झाल्याने त्याचा फटका परदेशात निर्यातसाठी पाठवलेल्या कंटेनरला बसला आहे. विशेष बाब म्हणून मलेशिया, दुबई आणि श्रीलंका येथील जहाज पाच तास थांबवले होते. मात्र यंत्रणा ठप्प झाल्याने ते दिलेला कालावधी संपताच रवाना झाले. अशी माहितीपुढे आली  दिली.

      शुक्रवारी सकाळपासून मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झाल्याने त्याचा परिणाम आज शनिवारी ही दिसून आला. गुरूवारी संध्याकाळी जेएनपीटी बंदरात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कनार्टक, दिल्ली, हरियाणासह इतर राज्यातून कांदा, भाजीपालासह इतर माल भरून शनिवारी सकाळपर्यंत सुमारे ८५०० ते ९०००  कंटेनर जेएनपीटी बंदराच्या गेट पर्यंत पोहचले. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झाल्याने परदेशात निर्यातीसाठी पाठवलेल्या कंटेनर जेएनपीटी बंदराबाहेर अडकले.